ज्या श्री जगदंबेच्या सभामंडपात काळ स्वतः गोंधळ जागरण घालतो. सुर्य चंद्र स्वतःच्या पोट पेटवतात. श्री विष्णूंचा शेषनाग स्वतः प्रत्यक्ष भुत्या होवून नाचतो तसेच तिच्या नामोच्चाराने महिषा सुरास भीतीने कंप सुटतो अशा या आदिशक्ती जगदंबेस आम्ही साष्टांग दंडवत घालतो.
जिने प्रभू श्री राम चंद्रास अखिल मानवजातीच्या धर्मरक्ष्यनार्य दशानन रावणास मारण्यास साहाय्य केले.जिच्या प्रेरणेने शिवरायांनी पाची पातशाह्यात हल्लकल्लोळ माजवून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले. त्या जगदंबेची उपासना करून मिळालेल्या शक्तीमुळे धर्मवीर संभाजी महाराज प्रबळ यवनासमोर धर्म धर्म करीत मृतुला मोठया धैर्योदात्तपणे सामोरे गेले त्याच जगदंबेच्या साक्षीने धनुर्धर अर्जुनाने कौरव पतनासाठी शमीच्या वृक्षावरून आपले धनुष्य उचलले. जिला साक्षी ठेऊन पारतंत्र्य हिंदुस्तानात सावरकरानसारखी सोळा सतरा वर्षाची अजाण मुले देश स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा होम करण्यास शपथबद्ध झाली, ज्या श्री जगदंबेच्या प्रेरणेने धर्म व देश स्वातंत्र्याच्या स्थंडीलावर आपले संपूर्ण जीवन समर्पित करून ज्या असंख्य ज्ञात, अज्ञात सहस्त्रावधी धर्मविरानी, क्रांतिवीरांनी तिचा हा जागर गोंधळ चालू केला, तो तसाच चालू ठेवण्या करिता व त्यापासून धर्म संवर्धन करण्याकरिता साताऱ्यातील सदरबझारमधील मानाचे श्री भारतमाता मंडळ दुर्गाउत्सव व इतर धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून गेली ४८ वर्षे कार्यरत आहे.
चला तर गड्यांनो, आपणसुद्धा आम्हासोबत या आईच्या व देव, देश धर्माच्या गोंधळात सहभागी होऊन अखिल हिंदुधर्माचा जागर घालूया.
बोला...
आई राजा उद उद उद !.!.