मूर्तीचे स्वरूप

        श्री भारतमाता मंडळाचे श्रीमूर्तीचे रचनाकार यांनी अतिशय तन्मयतेने रचना केलेली अष्टभुजा स्वरूपातील व महिषासुराचे मर्दन करणारी अश्या या आदिशक्ती जगदंबेचे स्वरूप हे प्रत्येक भक्तगणांचे मन प्रसन्न करणारे असे आहे. मंडळातील कार्य कर्त्यांनी व भक्तगणांनी नवसपूर्तीकरिता अर्पण केलेल्या दागीण्यामुळे श्री दुर्गेचे स्वरूप हे फारच सुंदर दिसते.


मूर्तीचे स्वरूप
१) अष्टभुजा स्वरूपातील व महिषासुराचे मर्दन करणारी व आपल्या प्रियतम आसनावर सिंहारूढ झालेली आदिशक्ती माता श्री तुळजाभवानी
२) श्री दुर्गामाता मुकुट २.५ कि. ग्रॅम पूर्ण चांदीचा
३) श्री दुर्गामातेचे मनीमंगलसूत्र २ तोळे सोन्याचे
४) श्री दुर्गाशत्र २ कि. पूर्ण चांदीचे
५) श्री दुर्गेचा उजवा पाय १ कि. पूर्ण चांदीचा
६) दुर्गेचे कंठआभूषण हार ४ तोळे सोने व १ कि. चांदी
७) श्री दुर्गेची कर्णभूषणे ३ तोळे सोन्याची

  असे हे श्री दुर्गामातेचे भव्य व मनमोहक स्वरुपात १२ फुट मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येते.

                                                                                  आई राजा उद उद उद !!