मंडळस्थापना

        ४८ वर्षापूर्वी सदरबझार सातारा येथील १५-१६ तरुणांनी एकत्र येउन सामाजिक बांधिलकीतून व धर्मजागरनाच्या जाणीवेतून काहीतरी कर्तव्य करण्याचा ध्यास मनी घेतला. व ह्या धेयातूनच त्यावेळच्या परिस्तिथिनुसार हिंदूधर्माची जी संघटनात्मक उणीव होती, ती भरून काढण्या करिता शक्तीची अधिष्ठात्री देवता आदिशक्ती माता श्री जगदंबा व बुद्धीची देवता जी श्री गणेश या देवतांचा जागर गोंधळ घालून प्राणप्रतिष्ठा करण्याकरता चौक मांडला व श्री गणेशाची स्थापना केली.

        कोणत्याही संघटनेच्या जन्मापासून तिला ज्या अडीअडचणींना तोंड द्यावे लागते त्या सर्व अडचणीवर या तरुणांनी स्वतःच्या ध्येयप्रेरणेने मात करीत त्यास एका महोस्त्वाचे स्वरूप दिले. सुरवातीस श्री गणेश उत्सव चालू करून पुढील वर्षी शक्तीची अधिष्ठात्री देवता श्री दुर्गा तिची स्थापना करण्याचा विचार केला व गणेशोस्तव व दुर्गा महोस्तव करण्यास सुरवात झाली. सन १९६७ साली मंडळ शासकीय नियमानुसार नोंदणीकृत करावे असा काही जेष्ठांनी सल्ला दिल्याने मंडळ मंडळ नोंदणीकृतकरिता 'भारतमंडळ' या नावाकरता प्रयत्न सुरु झाले परंतु धर्मादाय विश्वस्थ कार्यालयातून 'भारतमंडळ' या नावास आक्षेप घेतला गेल्याने पुढे पूर्ण विचारांनी आदिशक्ती जगदंबेचे रूपक असलेले "भारतमाता मंडळ " हे नाव स्वीकारून या नावाने मंडळ नोंदणीकृत करण्यात आले. त्या वेळेपासून मंडळाच्या संस्थापकांनी जो हेतू मनात ठेऊन जगदंबेच्या आशीर्वादाने जो वारसा आम्हाला दिला त्या मार्गाने आम्ही मार्गक्रमन करीत असून पुढील पिढीकरिता त्याचे जतन करीत आहोत.

                                                                                आई राजा उद उद उद !!