सामाजिक धार्मिक व इतर उत्सव व उपक्रम

        १९६८ पासून आदिशक्ती माता जगदंबेच्या आशीर्वादाने व मंडळातील सदस्यांच्या मह प्रयासाने मंडळाने स्वतःच्या प्रगतीबरोबरच सामाजिक, आर्थिक, धार्मिक आघाड्यांवर आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. मंडळाच्या स्थापनेनंतर काही निवडक व्यक्तींनी समाजाचा जो सर्वात महत्वाचा विषय अर्थ या संदर्भात असतो, त्याकरिता "भारतमाता नागरी सह. पथ संस्थेची" स्थापना करून तिच्या माध्यमातून समाजातील सर्वच स्तरावरील लोकांकरिता कार्य करून बहुमुल्य वाट उचलला आहे व उचलीत राहील. असे म्हणाले तरी वावगे होणार नाही कि भारतमाता नागरी सह. पतसंस्था ही सदरबझारची अर्थवाहिनी होऊन राहिली आहे.

        "मंदिरे ही धर्माची प्रेरणास्थाने असतात" त्यामुळे सदरबझार मधील मंदिराच्या जीर्णोधारा करिता मंडळाने हनुमान मंदिर विश्वस्थ मंडळ व जीर्नोधार समितीच्या माध्यमातून भरघोस कार्य केले आहे व करीत राहील. मंडळाने हनुमान मंदिर जीर्णोधाराकरिता ३.५ लाख रुपये देणगी देऊन आपला खारीचा वाटा उचलला आहे. सदरबझार मधील रहिवासी व बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरता मंडळाने पुढाकार घेऊन "भारतमाता बस थांबा" व "भारतमाता रिक्षा थांबा" उभा करून रहिवाशांची सोय करण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे.

        मुलांची तसेच युवकांची गणना ही समाजाच्या शक्तीस्थानात होते या विचारातून मंडळाने १.५ लाख रुपये देणगी देऊन "भारतमाता व्यायामशाळा " व "भारतमाता स्पोर्ट्स क्लूब" उभारण्याकरता लक्षवेधक योगदान दिलेले आहे.

        मंडळाने मंडळातील सभासदांतील काही सभासदांच्या वाद्य कलेस प्रोत्साहन देणेकरीता मंडळातील सभासदांच्या स्वः खर्चातून स्वतःचे असे झांज पथक व नाशिक बाजा यांचे पथक स्थापन केले आहे. याचबरोबर मंडळाने इतर धार्मिक व प्रेरणात्मक उत्सव दरवर्षी साजरे करणे चालू ठेवले आहे.

        मंडळ दुर्गा उत्सवाच्या बरोबर गणेशोस्तव, नृसिंहजयंती, हनुमान जयंती, महाशिवरात्री, शनिजयंती व शनि अमावस्या असे धार्मिक उत्सव तसेच शिवजयंती, बलिदानमास, स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन साजरे करून त्याचे महत्व समाजात रुजवून आपले सामाजिक व धार्मिक कार्य करीत आहे.

        या बरोबरच मंडळाने आपले वेळोवेळी बेवारस, अनाथ व्यक्ती मयत झाल्यास धनाने व कार्यतत्परतेने साह्य केले आहे. मंडळ वेळोवेळी "रक्तदान शिबीर", "आरोग्य तपासणी शिबीर", व "नेत्रचिकित्सा शिबीर" अशा शिबिरांचे आयोजन करून समाजकारणात आपली भूमिका बजावत आहे.

        याप्रमाणे मंडळ यापुढेसुद्धा धार्मिक, सामाजिक, आर्थिक, कार्यात भाग घेत राहील मंडळाने वेळोवेळी भूकंप ग्रस्तांना केलेली मदत व आताच झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे सातारा मधील कैलास स्मशानभूमीच्या झालेल्या नुकसान भरपाइस १०,०००/- रुपये ची मदत करून सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलून समाजास एक प्रेरणा दिलेली आहे.