दुर्गामाता महात्म्य

| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके |
|| शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||

          आदिशक्ती माता श्री तुळजाभवानी ही जसे मातृत्वाचे प्रतिक आहे तसेच धर्मरक्षनार्य ती संहारकतेचे सुद्धा प्रतिक आहे. अधर्म हा जेव्हा धर्मास आळण द्यावयास लागतो, त्यावेळेस तुळजाभवानी ही दुर्गारुपात महिषासुर रुपी अधर्माचे निर्दालन करते. तिच्या नावाने जोगवा स्वीकारताना गोंधळी तिचे रूपवर्णन म्हणतो. दुर्गेच्या मुखास साक्षात शिवशंकराचे तेज विद्यमान झालेले दिसते त्याने ज्याने असुरांच्या मनास कंप सुटत होता. युद्ध्यामुखी दुर्गेच्या केसांचा सांभार कालरूपी यमासारखा भासत आहे. श्री विष्णूच्या सर्व शक्तींनी युक्त असे जगदंबेचे अष्टभुज हे महिषासुर निर्दालन्यास सरसावले आहेत. ब्रम्हतेजाने युक्त असे श्री दुर्गेचे दोन्ही पद हे युध्पावित्रा घेण्यात निष्णात आहेत. दुर्गेच्या दोन्ही डोळ्यात स्वतः सूर्यतेज सामावत असून तिच्या नेत्रतेजाने अधर्मरुपी असुर जागेवरच भस्म होत असे. प्रत्यक्ष शिवशंकराने दिलेले त्रिशूल धारण केलेली व विष्णूचे सुदर्शन हाती उचलेली जगदंबा ही रौद्रतांडव करीत असे. इंद्रवज्र हाती घेऊन व कालदेवतेचे खड्ग घेऊन जगदंबा ही असुरांवर चाल करून जात आहे. अशा प्रकारे आदिशक्ती माता श्री दुर्गा ही वीस आयुधे धारण करून असुर निर्दालन करण्यास शस्त्रसज्ज झालेली असे. तेंव्हा अश्या या आदिशक्ती माता श्री दुर्गा मातेस साष्टांग दंडवत घालतो आम्ही.


                                                                                   आई राजा उद उद उद !!